Monday, September 5, 2022

परिपक्वता

परिपक्वता खर्या अर्थाने आली पाहिजे.

कोणाचं आहे माहित नाही पण एक सुंदर वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरल्या गेलंय. 


" Any success at the cost of family is really failure " 


मनुष्यानी कितीही प्रगति केली , पैसा , किर्ती मनमरातब मिळवला पण जर कुटुंबातील सर्वांकडे दूर्लक्ष करुन प्राप्त केलं असेल तर ती आयुष्यातील मोठी हार असेल. 


ज्या करिता आपण लग्न करुन कुटुंब वाढवलं त्यांच्या शारिरीक, मानसिक गरजांकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं आहे. 


कुटुंबातील प्रत्येकाच्या समस्या समजून घेणं त्यावर उत्तरं शोधणं , त्रासात धीर देणं तसंच छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण करणं , आनंदात सहभागी होणं हा कुटुंबप्रमुखाच्या कर्तव्याचा अविभाज्य भाग आहे. 


हे सर्व करत असताना आपली मुलं मोठी झाल्यावर मुलांना त्यांच्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी, त्यांना त्यांच्या मनानी काळानुरुप बदल करण्यासाठी मोकळीक देणं आवश्यक आहे. 


छोट्या छोट्या गोष्टीं मधे आपला अट्टाहास सोडायला हवा. कारण आपला अनाठायी अहंकार कुरवाळण्यात आपल्या माणसांना दुखवत तर नाही ना ? असा विचार करायला हवा. 


आम्ही नाही का आमच्या आई-वडिलांची , सासू -सासर्यांची सेवा केली मग मुलांनी आमची सेवा करायलाच हवी हा विचार करणे म्हणजे आपण जबरदस्तीने आपला दबाव त्यांच्यावर टाकण्यासारखे आहे. 


त्यापेक्षा आपण वयानुसार मनाने अलिप्त राहून मुलांना त्यांच्या गरजेनुसार हवी तेव्हा मदत करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आपली ही मानसिक घडण ही परिपक्व होत जाते. 


वैयक्तिक उन्नयन होण्यासाठी देखिल स्वतःमध्ये बदल स्वीकारण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. 


अनिरुद्ध कवीश्वर -

Sunday, September 4, 2022

आनंद वाद चिघन वस्तु ना कंडे

 ४  सप्टेंबर                                                                        "आनंदवाद चिघन वस्तु ना कंडे..."  


'घनदाट आनंदरूप ब्रह्म मी पाहिले. " हे पद याचा अर्थ नागलिंगाच्या एका शिष्याने लिहिले आहे. परमार्थातील अनेक श्रेष्ठ अनुभवांचे वर्णन यात आहे. 


"सूर्य नसताना सूर्यप्रकाश मी पाहिला. देहभाव विसरल्यावरच आत्मदर्शन व आत्मज्ञान होते असे कवि म्हणतात." तानु अल्लद तन्न तद्रुप मनयल्लि" असे ते म्हणतात. साधकाने स्वतः केलेल्या पुण्याचे हे फळ आहे. अंतःकरणातील आतल्या गाभ्यात निळा आरसा आहे. त्या आरशामध्ये निळे वर्तुळ आहे. त्या वर्तुळात खेळणारी 'वस्तु' काय आहे? असे कवि विचारतो - 'मंडळदोळगाडुवदेन्नम्मा"


गुरूकृपेंने उन्मनी अवस्था प्राप्त झाली म्हणजे देवाचे असे अपरूप व सुंदर रूप दिसते. सेरी उन्मनियोळु गुरूविन पुण्यदि घन 'वस्तु' दोरकितु यनगम्मा ‘‘यानंतरचे अनुभव असाधारण आहेत - त्याचे वर्णन करताना कवि म्हणतात, ‘‘पाण्याच्या मध्यभागात एक अश्वत्थ वृक्ष आहे. त्यास फुले नव्हती परंतु लहान, कोवळी, पिकलेली, फळे लागली होती व ती रसाने भरलेली होती. हुविल्ल मिडगायी हण्णम्मा' !


अमर्याद दाट अरण्यामध्ये एक घागर अमृताने भरून वाहात असलेली दिसली. ते अमृत पुनःपुन्हा आकंठ पिऊन मी फार सौख्याचे व आनंदाचे जीवन आक्रमीत होतो. "अखंड वनदोळु अमृत कोडु उक्कि उडुंडु सुखिसि बाळुवेन्नम्मा. यास जे दर्शन झाले ते आध्यात्मिक होते- ते कैलासाचे नव्हे व तेथे देवाच्या अंगावर सोन्याचे अलंकार नव्हते म्हणून ते वैकुंठही नव्हे - तर त्या अमर्याद आकाशामध्ये (लीलया इतस्ततः फिरणारे) काय होते ? (बैलोळगाडुवदेनम्मा) - -


कवी म्हणतो “केवळ माझे सद्गुरू - नागलिंग-यांच्या कृपेने मला सर्वोच्च व स्थिर मुक्ति प्राप्त झाली "


दैनंदिन ।। गुरूबोध ।। (२५३)

आनंद बाळ जोशी यांची फेसबुक वरील पोस्ट


मनाच्या उन्मनी अवस्थेत, सद्गुरूं प्रति उत्कट भावामध्ये स्वस्वरुप विलीन झाल्यामळे अनुभवाला आलेली चिद्घन आनंदमय जाणिव . खूप सुंदर रित्या पदावली मधे वर्णिली आहे. अनुवाद सोबत दिल्यामुळे त्याचा आनंद घेता आला. 

शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹

अनिरुद्ध कवीश्वर-

Thursday, September 1, 2022

Hindu our life culture

 *What is So Special about being a Hindu ?* --- by *Francois Gautier*


1) *You Believe in God ? * - In Hinduism you are accepted as an Aastik-आस्तिक् 


2) *Don't believe in God ?* You're accepted as Nastik-नास्तिक्


3) *You Want to Worship Idols ?* - Please go ahead. You are a *Murti Pujak- Choose Your Own Idol- Ram, Krishan,Vishnu what so ever form of GOD you like......*.


4) *You Don't want to Worship Idols ?* - no problem. You can focus on "Nirguna Brahma"-निर्गुणब्रह्म.


5) *You want to criticise something in our Hindu Religion ?* - Come forward. We are logical. *Nyaya, Tarka & many more Granthas are core of our Hindu schools.*


6) *You want to accept Beliefs as it is?* - Most welcome. Please go ahead with it.


7) *You want to start your journey by reading Bhagvad Gita ?*- Sure ! most welcome. It is the essence of all scriptures in lucid style by Bhagwan Krishna.


8) *You want to start your journey by reading Upanishads ?* - Go ahead, it is core knowledge of vedas.


9) *You want to start your journey by reading Puranas ?* - Be my guest & be *a Gyaan Yogi.*.


10) *You just don't like reading the Puranas or other books ?* -No problem, my dear !  


*You can go by Bhakti tradition & be a Bhakti Yogi & Gyan Yogi like Prahlad, Tulsidas,Narsimha Mehta, Gyaneshwar, Tukaram, Eknath, Namdev, Pundarik, Tiru Valluvar, Thyagaraja,Meerabai, etc*.  ( bhakti = devotion)


11) *You don't like idea of Bhakti or Gyaan ?* -No problem. Do good Karma. *Be a karmayogi-कर्मयोगी*.


12) *You want to just Enjoy the Life ?* -Very good. Accepted. No problem at all. *This is Charvaka School of Thought-चार्वाक् विचारधारा*


13) *You want to abstain from all the enjoyment of life and find the God ?* - jai ho! *Be a Sadhu, an Ascetic -सन्यासाश्रमी !*


14) *You don't like the concept of God ? You believe in Nature only ?* - Welcome. *(Trees, Sun & Moon are our friends and Prakriti or nature are worthy & we worship them from ages )*


15) *You believe in one God or Supreme Energy ?* -Superb! *Follow Advaita Philosophy -अद्वैत वेदान्त*


16) *You want a Guru ?* -Go ahead. Receive Gyaan from a Guru-गुरुमहिमा ।


17) *You don't want a Guru ?* - Help yourself ! Meditate, Study and achieve the purpose of human life- Nirvana -निर्वाणः yourself !


18) *You believe in Female energy ? -We worship Shakti-शक्तिपूजन*


19) *You Believe that Every Human being is equal ? * -Yeah! You're awesome, come on let's celebrate Hinduism ! *"Vasudhaiva kutumbakam-वसुधैव कुटुम्बकम्" ( “the entire world is a family” is our core achievement of our Rishis )*. *कृणवन्तो विश्वम् आर्यम् - पुरे विश्व को श्रेष्ठ बनाना * - ये हर सनातनी मात्र का ध्येयमंत्र है ।  


20) *You don't have time to celebrate this Festival?*

-Don't worry ! One more festival is coming ! There are multiple festivals every single day of the year.


21) *You are a Working Person and Don't have a time for religion*? It's okay. You will still be a Hindu.


22) *You like to go to Temples ? * -Devotion to GOD is loved.


23) *You don't like to go to The Temples ? * - no problem. You are still a Hindu!


24) *We Believe that Hinduism is a way of life, with considerable freedom.*


25) *We believe that everything has God in it*. So we worship our Mother, Father, Guru, Tree, River, Prani-matra, Earth & whole Universe !


26) *If you don't believe that everything has GOD in it* - No problems we still Respect your viewpoint.


27) *"Sarve janaha sukhino bhavantu" -सर्वे जनाः सुखिनो भवन्तु । (May you all live happily ).*


*My dear brother Hindu !*

You represent these all & many more higher living standards ! You're free to choose still many more ways to live happily ever ! my dear Hindu !


This is the essence of Hinduism -all inclusive. 


That is why it has withstood the test of time inspite of repeated onslaught both from within and outside, and assimilated every good aspects from everything. That is why it is सनातन- eternal !


There is a saying in the *ऋग्वेदः _Rigveda_, -the first book ever known to mankind* which depicts the Hinduism philosophy in a Nutshell: 

"Ano bhadrah Kratavo Yanthu Vishwathah" आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वत: । (Let the knowledge & noble thoughts come to us from every direction). 


So celebrate being a Hindu !!!


नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे ! 🙏🏻

तस्मै पाणिनये नम: ।🙏🏻

नमः शान्ताय तेजसे । 🙏🏻

तत्त्वमसि ।☝🏻

प्रज्ञानं ब्रह्म । 👌🏻

अहं ब्रह्माऽस्मि ।👍🏻

हर हर महादेव ।🚩🚩🚩

कृष्णं वन्दे जगद् गुरुम्।🙏🏻🙏🏻🙏🏻

सनातन परमो धर्मः । ☝🏻👌🏻👍🏻🙏🏻🚩

🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳


फार सुंदर. We are born democratic. 


प्रत्येक मार्ग ईश्वराप्रति नेतो असा आमचा विश्वास आहे. म्हणून अघोरपंथाला ही स्वीकारले जाते. 


नागा साधू ही हिंदू धर्माचा एक भाग आहेत. 


भगवे , पांढरे , काळे , पिवळे सर्व रंगांचे वस्त्र वेगवेगळ्या पंथांनी स्वीकारले आहेत. ते ही हिंदूच आहेत. 


आस्तिक , नास्तिक , पारमार्थिक , अध्यात्मिक , पारलौकिक , वैज्ञानिक , भाविक , वस्तूनिष्ठ, सदाचारी ,   पश्चातदग्ध दुराचारी  , स्थितप्रज्ञ , शून्यवादी , पुनर्जन्म मानणारे न मानणारे , सर्वप्रकारच्या वैचारिक प्रवाहांचे असून ही हे सर्व हिंदू सनातनी आहेत. 


सर्वसमावेशक असा हा हिंदू सनातनी संस्कृतीचा मूळ गाभा आहे. प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे हा सनातनींचा दृढ समज आहे.

Sunday, August 21, 2022

शिवसंकल्पमस्तु

आपण सदैव एक कंफर्ट झोन पहातो. पण तो ही आयुष्यातील वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत अलग असू शकतो. 

कोई अचानक घटना  दिल , दिमाग को झंझोडकर रखती है और हमारा जीवन की ओर देखने का नजरीया बदल देती है l 

कभी ऐसा लगता है बाकी सारे दरवाजे बंद हुए है और हम एक दिशा में चलने के लिये मजबूर हो गये हैl कालान्तर में हमारे विचार बदलते है और ऐसा प्रतीत होता है के जो हुआ वह सही था ।  

Everything depends upon how one cultivates his / her mind to cope  with the abrupt change in the situation , comfort zone . 

मला " ईशावास्य इदम् सर्वम् ... त्येन त्यक्तेन भुञ्जिथा "  यानी भुरळ घातली आहे. अत्यंत नेमक्या शब्दांमधून प्रवर्तनाची दिशा दाखवली आहे. त्यागाच्या भावनेनी उपभोग घ्यावा हे तत्व स्वतः मधे आमुलाग्र बदल घडवून आणण्यास मदत करते. एक प्रकारे स्वस्थचित्त करते. 

खूपदा घडलेल्या अथवा घडणाऱ्या घटनांचे योग्य विश्लेषण करणे आपल्याला जमत नाही. एक गोंधळ मनाला व्यापून टाकतो . आपण चाचपडत रहातो. हे चाचपडणे सुध्दा महत्वाचे आहे. गोंधळ सुध्दा शिक्षणाचा एक भाग आहे हे उमजू लागलं की खर्या अर्थाने व्यष्टी आणि समष्टी मधे संतुलन तयार होऊ लागतं. ही मनाची योगसाधना फार महत्वाची आहे. 

आपल्याला आलेले अनुभव आपण कोणत्या कसावर पारखतो ते आपली पुढील वैचारिक बैठक कशी असेल ते ठरवतं. यासाठी वर्षानुवर्षे ऋषि , मुनी सृष्टीच्या उत्पत्तीचे गूढ समजून घेण्याच्या मागे असतात. 

" तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु " या संकल्पना प्रति जागरुक होणं म्हणजे ज्ञानमार्गावरील वाटचालीची सुरुवात. 🙏🙏



Thursday, August 18, 2022

जय जय रामकृष्णहरि

 मुलांची जबाबदारी वाढती असते . आईची जबाबदारी संपत नाही. 


आपल्या पिढीतील सर्वांना आधीची पिढी आणि नंतरची पिढी दोघांनाही धरुन ठेवायची सवय आहे. ते एका अर्थाने बरोबर असले तरी वैयक्तिक आयुष्यात आपली मूळ अध्यात्मिक प्रवृत्ती अधून मधून उचल खाते. 


मी आणि माझी कुलदेवता, माझे आराध्य दैवत , माझे गुरु यांच्यातील अनुबंध अंतर्मनात जागृत असतो. तसाच काळोखात खोल मनात  एक दुखरा कोपरा ठसठसत असतो. आपल्याशीच संवाद साधणारा ,  मध्यमेतला कातर स्वर . जखमेची ही सवय व्हावी तसा . 


आयुष्य म्हणजे वळणा वळणाची वाट . कधी कोणते वळण घेईल याची तिळमात्र कल्पना नसलेला मार्ग. सर्व भार महाराजांवर सोपवून भोगणे अथवा उपभोगणे एवढेच आपल्या हाती. 


 स्मशान वैराग्य , वैराग्य , ज्ञानोत्तर वैराग्य एकेक अवस्था नकळत येणारी . माऊलींनी भक्तिरसपूर्ण ज्ञान आणि रसिकता यांची सांगड घातली. जिवंतपणे मोक्षाचा अनुभव देणारे अमृतानुभव सांगून अलौकिक जाणिवांचा वर्षाव केला. 


नवरसात्मक भावभावनांच्या  पलीकडील दीर्घ शांततेतील अविरत उठणार्या आनंद कल्लोळाच्या  ऊर्मी शब्दांत गोठवल्या. बस्स!! आता  स्वयंभू , स्वसंवेद्य  आत्मरुपातील स्फुरण केवळ स्वानंदघन सोहळा.


जय जय रामकृष्ण हरि

जय जय रामकृष्ण हरि 


🙏🙏🌹


अनिरुद्ध कवीश्वर -

Saturday, July 30, 2022

शोध अंतर्मनाचा...

 

शोध अंतर्मनाचा ...

आपण जितकं बोलून किंवा लिहून शब्दांतून व्यक्त होतो त्यापेक्षा कैक पटीनी मोठ्या मौनात , शांतीमधे त्याचं अस्तित्व अवस्थित असतं. अनंत झगमगणार्या प्रकाशमय दूधगंगांना ही सामावून घेणारी तथाकथित पोकळी अंधारीच असते.

काळोखाला ही वाणी असते का ? की केवळ हुंकार "तथास्तू" म्हणणारा ? कालातीत , सदैव वर्तमानात , संवादी ? कुठल्याही माध्यमांची गरज नसलेला , स्वयंभू?

निव्वळ स्पंदन , प्रसारीत होत जाणारी एक अविरत  उर्जा , अनादि-अनंत , शिव संकल्प ...

घटना म्हणजे स्पंदनांचा दृष्य परिणाम !! कुठलीही उपाधि नसलेला . वेध शाश्वताचा , सातत्याचा , सत्याचा की स्वयंस्फूर्तीने दूर होणार्या पटलांचा ? आजचे सार्वकालिक  ज्ञानोपरांत तात्कालिक या वर्तुळाकार मार्गाचा ?

मागोवा माझाच , मीच घेतलेला, की शोध अज्ञाताचा ? अनुत्तरीत मालिका अवरुद्ध करणारी की मुक्तीचे दरवाजे किलकिले करणारी एक यक्षप्रश्न !!

मानस एकच , चित्त एकच फक्त वृत्तीची आवर्तने वेगवेगळी .  " जगन्मिथ्या " , " एकोहं ",  " तत्वमसि " "अहं ब्रह्मास्मि " ज्ञानेश्वर माऊली च्या भाषेत "आत्मरुपा"

मौनाची भाषा अनुभव समृध्द करणारी 🙏🙏

अनिरुद्ध कवीश्वर-

Tuesday, July 26, 2022

ज्याचा त्याचा कृष्ण ...

 जन्म आणि मृत्यू ही फक्त स्थित्यंतरे आहेत. प्रत्येक क्षणाक्षणाला शारीरिक तसेच मानसिक स्थितीमध्ये ही बदल होत असतात. जीव सतत दु:खात किंवा सतत सुखात ही राहू शकत नाही.


मन जिथे जिथे म्हणून संलग्न होतं तिथे तिथे सर्व भावभावना रुजतात. सुख दु:ख या मनाच्या संकल्पना आहेत.  मनाविरुद्ध अथवा न रुचणार्या गोष्टींमुळे दु:ख वाटते. मनासारखं झालं म्हणजे सुखावह क्षण छान वाटतात. 


माझ्याच वाट्याला का यावे दु:ख हा प्रश्न फार त्रास देतो. 


बुध्दिवंतांसाठी आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत , संदेह मिटला पाहिजे , बरोबर असो की चूक सर्व गोष्टी मला कळायलाच हव्यात हा अट्टाहास मनुष्याला सतत अस्वस्थ करतो. साहजिकच त्याचे मनस्वास्थ्य बिघडते. 


नामस्मरणाने तर कोणाला गायनानी , वादनाने , कोणाला नृत्यानी , वाचनानी कधी कोणाला भटकंती केल्यानी , कोणाला समुद्राकाठी - नदीकाठी शांत बसल्यानी  चित्त हळूहळू मनाला दिशा देते. आपापल्या कृष्णाच्या रुपाशी मन जडले की इतर व्यवधानं सावकाश का होईना कमी होत जातात अन् त्या अनुषंगाने वैचारिक गोंधळ कमी होतो. 


विचारांमध्ये सुस्पष्टता आली की कार्य करण्यात शिस्त येते. संतोषानी मनाची चलबिचल कमी होते. 


जीवाचा विसावा त्याला माहित असतो. ज्याच्या त्याच्या कृष्णाची स्पंदने कुठे , कशी जाणवतील हे तो कृष्णच ठरवतो.


अनिरुद्ध कवीश्वर -

Sunday, July 24, 2022

ताटीचे अभंग - मुक्ताबाई

 

ताटीचे अभंग १ ते १२


संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥१॥
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान ॥२॥
थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥३॥
रागें भरावे कवणाशी। आपण ब्रम्ह सर्वेदेशी ॥४॥
ऐशी समदृष्टी करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


योगी पावन मनाचा।साही अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागें झाले वन्ही। संती सुखें व्हावें पाणी ॥२॥
शब्द शस्त्रं झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सुखसागरी वास झाला।उंच नीच काय त्याला॥१॥
अहो आपण जैसे व्हावें। देवें तैसेंचि करावें ॥२॥
ऐसा नटनाटय खेळ। स्थिर नाही एकवेळ ॥३॥
एकापासुनी अनेक झाले। त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
शून्य साक्षित्वें समजावें । वेद ओंकाराच्या नावें ॥५॥
एकें उंचपण केले। एक अभिमानें गेलें ॥६॥
इतकें टाकुनी शांती धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥


वरी भगवा झाला नामे। अंतरीं वश्य केला कामें ॥१॥
त्याला म्हणूं नये साधू। जगी विटंबना बाधू॥२॥
आपआपणा शोधून घ्यावें। विवेक नांदे त्याच्या सर्वे ॥३॥
आशा दंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


संत तेचि जाणा जगीं। दया क्षमा ज्यांचे अंगी ॥१॥
लोभ अहंता न ये मना। जगी विरक्त तोची जाणा ॥२॥
इह परलोकीं सुखी। शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥३॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


एक आपण साधू झाले। येर कोण वाया गेले ? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ। अवघे मायेचें गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हां। विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥३॥
ऐसा उमज आदिअंतीं। मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

ब्रह्म जैसें तैशा परी।आम्हा वडील भूतें सारी ॥१॥

अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥२॥

जीभ दातांनी चाविली। कोणें बत्तीशी तोडीली? ॥३॥

मन मारुनी उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥१॥

बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥२॥

जीव जीवासी पैं दयावा । मग करूं नये हेवा ॥३॥

तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सांडी कल्पना उपाधी। तीच साधूला समाधी॥१॥

वाद घालावा कवणाला। अवघा द्वैताचा हो घाला॥२॥

पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥३॥

एक मन चेष्टा करी। भूतें बापुंडी शेजारी ॥४॥

अवघी ईश्वराची करणी। काय तेथें केलें कोणीं ॥५॥

पुन्हा शुद्ध मार्ग धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥


१०

गिरीगव्हारे कशासाठीं। रागें पुरवीली पाठी ॥२॥

ऐसा नसावा संन्यासी। परमार्थाचा जो कां द्वेषी ॥३॥

घर बांधिले डोंगरी। विषया हिंडे दारोदारीं ॥४॥

काय केला योगधर्म। नाही अंतरी निष्काम ॥५॥

गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥


११

अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥१॥

ऐसे कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥२॥

ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥३॥

वेळे क्रोधाचा उगवला। अवघा योग फोल झाला॥४॥

ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


१२

अवघी साधन हातवटी। मोलें मिळत नाही हाटीं ॥१॥

शुद्ध ज्याचा भाव झाला। दूरी नाही देव त्याला॥२॥

कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥३॥

लडिवाळ मुक्ताबाई। जीव मुदल ठायीचे ठायीं ॥४॥

तुम्ही तरुनी विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


सारा खेळ माझाच हा 

मीच मांडिला मोडिला

अवघे अस्तित्व माझेच

मीच राखिले अन् विरवीले 


स्वानंदे रचिली कहाणी

नसे इथे दूजा कोणी

आपुलेच शब्द अन् गाणी

आळविणे सूर निजकंठी 


विस्तार माझ्या कल्पनेचा

माझ्या हाती न राहिला

पुढे सरता वाढता जाई

आकळिले तरी वळत नाही 


" मन मारुनी उन्मनी करावे " 

असे जेव्हा मुक्ताबाई माऊलीला समजावून सांगते तेव्हा अपेक्षाभंगातून निर्माण झालेल्या क्रोध आणि उद्वेगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. संतांची शब्दयोजना ( टर्मिनालॉजी ) वेगळी असेल पण आधुनिक मानसशास्त्राच्या सीमा त्यांनी ओलांडून निखळ सत्याचा मार्ग स्वतः च्या जीवनदर्शनातून मांडला आहे. 

अनिरुद्ध कवीश्वर-




Friday, July 8, 2022

परतवारी...

 परतवारी...


 पुढे चालणे म्हणजे मागे परतणे ...


ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्। ...

भगवत् गीता अध्याय १५ श्लोक क्रमांक 


वरवर पहाता विक्षिप्त वाटणार्या संकल्पना सूज्ञ मनाला अध्यात्मिक विषयाबाबत कौतुहल निर्माण करणार्या आहेत. 

अध्यात्मयोगामधे अनुप्रसव आणि प्रतिप्रसव अशा संकल्पना आहेत. अनुप्रसव म्हणजे सूक्ष्मातून स्थूलात येणे आणि प्रतिप्रसव म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे परतणे. एकप्रकारे मनाशी मनाद्वारे घडवून आणलेली परतवारी. 

उर्ध्वगति अन् अध: गति अशा दोन गति आहेत. या फक्त दिशा दर्शवणार्या आहेत. उर्ध्वगति ही सृष्टीच्या मूल कारणा कडे नेणारी समजल्या गेली आहे . अध: गति ही त्यांच्या विपरीत म्हणजे मूल उर्जेतून प्रसरण पावत असलेल्या स्थूल प्रकृतिस संबोधित करते. 

अध्यात्मातील प्रगति ही मोक्षप्राप्ती साठी उगमाकडे , मूलाकडे नेणारी असते. यासाठी योजिलेला शब्द म्हणजे प्रतिप्रसव प्रक्रिया. हा असा गूढार्थ , पुढे चालणे म्हणजे मागे परतणे यात अभिप्रेत आहे. तोच उर्ध्वमूलं मधे ही आहे. 

शैव मतानुसार मूळ उर्जेतून शिवसंकल्पाच्या योगानी अनंत दिशांनी , अनंत शाखांमधून विभाजित होणारी शक्ति सृष्टीच्या माध्यमातून दृष्यमान होते . ही अनुप्रसव प्रक्रिया, हेच " अध: शाखम् ". 

अश्व: चा एक अर्थ ज्याची गति तीव्र आहे असा आहे. गति असणारे ते सर्व अशाश्वत आणि त्या विरोधी श्व: म्हणजे स्थिर म्हणजे शाश्वत , नित्य. 

तत्वतः पुढे चालणे किंवा उर्ध्वगति म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे , शाश्वताकडे चालणे आणि सूक्ष्मातून स्थूलाकडे चालणे म्हणजे अध:गति .


संत चोखामेळा म्हणतात , 

" ऊस डोंगा परि रस नाही डोंगा 

  का रे मुलालाही वरलिया रंगा " 

वरवरच्या भ्रमित करणार्या शब्दार्थापेक्षा भावार्थ अन्  गूढार्थाकडे लक्ष द्यावे . खरे अमृत दोहन ते आहे. 🙏🙏


अनिरुद्ध कवीश्वर -

Wednesday, July 6, 2022

मन एव मनुष्याणाम् कारणम् बन्धमोक्षयो:

 मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥


मन ही सभी मनुष्यों के बन्धन एवं मोक्ष की प्रमुख कारण है। विषयों में आसक्त मन बन्धन का और कामना-संकल्प से रहित मन ही मोक्ष (मुक्ति) का कारण कहा गया है ॥


मनाच्या वृत्ती सारख्या बहिर्गामी तर कधी अंतर्यामी कल्पनाविलासात रमलेल्या असतात. स्वप्न आणि जागृती यांचा लपंडाव सुरु असतो. तळ्यात मळ्यात असल्यासारखी परिस्थिती. मनाचा जोर इतका जबरदस्त असतो की त्यायोगे बुद्धी आपल्या कोणत्याही कृतींचे समर्थनार्थ प्रतिवाद करुन सत् पासून दूर जाते. मोहाचे क्षण बंधनात टाकत आहेत याची जाणीव सुध्दा होऊ देत नाही. अशा मोहाचा नाश म्हणजेच मोक्ष. 


जसजसे तुम्ही अध्यात्मात खोल तन्मयता साधू जाता तेव्हा माया आपले मायाजाल अधिक गडद करते. 


आपल्याला असं वाटू लागतं की आता आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त झालंय . आपली कृतिशून्यता म्हणजे उच्च दर्जाची कार्यक्षमता अशी समजूत मन करुन द्यायला लागते. तो फार निसरडा क्षण असतो. 


प्रकृति अनंत मार्गाने आपल्याला भुलवते. आपलं डोकं भिन करुन टाकते. आपण जे काही करतो ते योग्यच आहे किंबहूना तेच योग्य आहे असा मनाचा पक्का समज होतो अन् केव्हा आपला मार्ग अहंकाराच्या दिशेनी निघाला समजतच नाही. 


अखंड सावधानता आणि अंतर्मुख होऊन पुन्हा पुन्हा आपल्या वृत्ती तपासून घ्याव्या लागतात.  


नामस्मरणाने चित्ताची प्रसन्नता अनायासेच येऊ लागते. 🙏🙏🌹


अनिरुद्ध कवीश्वर -

Thursday, June 30, 2022

दर्शन शास्त्र

 आपण देवदर्शनाला जातो तेव्हा आजूबाजूची परिस्थिती पाहून अनंत विचार आपल्या मनामध्ये येतात. कधी भिक मागणे अस्वस्थ करते , कधी अस्वच्छता , कधी दर्शनासाठी ची ढकला ढकली , कधी पैशाचा चाललेला दुरुपयोग तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड करणार्या दर्शनार्थीं ना पाहून नेमके हे देवदर्शनासाठी आले की कशासाठी हा प्रश्न उभा रहातो. 

प्रासंगिक आणि सांसारिक प्रश्नांचा भुंगा मनाला पोखरत असताना भगवंताची स्मृति बाजूलाच रहाते. 

दर्शनासाठी रांगेत उभे असताना मनांत असंख्य विचारांची गर्दी होते. भगवंताच्या विग्रहाचे आपण दर्शन घेतो म्हणजे खरोखर 

" डोळ्यानी पाहीन रुप तुझे .." असे होते का? 

मनोमन आपण त्या ईशतत्वापाशी एकरुप होतो की जीवनामधल्या समस्यांच्या उत्तरांची अपेक्षा करत असतो ? हा देव मला चिंतामुक्त करील अशी आशा करतो ? बरं तो तसा ठामपणे विश्वास ठेवण्याची आपल्या मनाची तयारी असते का ? की सोयीनुसार आपण ठरवतो ? आपलं काम झालं तर हा देव खरा नाही तर दगड ? 

मन हे सहावं इंद्रिय असलं तरी पंचमहाभूतांनी तयार झालेल्या कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये या दश इंद्रियांवर मनाचे वर्चस्व असते. सदसद्विवेकबुद्धी नी निर्णय दिल्यावर ही देहाधिष्ठीत जीवा ला फरफटत ओढून नेण्याची शक्ती मनामधे असते. 

आपल्या विचारांशी आपलाच झगडा सुरू असतो त्याचाच उल्लेख करताना तुकाराम महाराज म्हणतात " रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग ". आशा निराशेच्या खेळात त्रयस्थपणे , साक्षीभावाने प्रत्येक गोष्ट अनुभवणे म्हणजे अंतर्मनाच्या शुध्दिकरणाची प्रक्रिया. 

खरं म्हणजे तीर्थस्थळी देवदर्शनापेक्षा या अशा आत्मदर्शनाची संकल्पना मला जास्त संयुक्तिक वाटते. 

अनिरुद्ध कवीश्वर -


Thursday, June 9, 2022

मनाची प्रयोगशाळा

 मनाची प्रयोगशाळा !! 


खरोखर मनाच्या आंत डोकावण्याची इच्छा होईपर्यंत धडाधड नवनवीन गॅझेटस् मनाचा ताबा घेतात . त्याचा उपयोग उत्तमरित्या समजेपावेतो दुसरं काही अंगावर धडकतंय. सॅटेलाईट च्या माध्यमातून रिमोट प्लेसेस वरुन सर्जरी करणं शक्य झालंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नी हळूहळू मशीन्सवर ताबा मिळवला आहे. लॉग डिस्टन्स सेन्सर्स मुळे दूर अंतरावर असलेल्या व्यक्तिचा स्पर्श अनुभवण्या इतपत प्रगति आधुनिक शास्त्रांनी केली आहे. वर्चुअल आणि रिअल त्यामधली रेषा धूसर होत  मनाला स्वतः चे अस्तित्व विसरायला लावणारी अवस्था. चांगली की वाईट ? धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी गति. प्रचंड वेग आहे या सर्वाला. जीव धास्तावतो. टाईम प्लीज म्हणून थोडी विश्रांती घ्यायची म्हणजे आपण जगाच्या मागे पडू अशी भीति . 

सोयीसाठी वाहन म्हणता पायी चालण्यातला आणि चालता चालता स्वतः शी संवाद साधण्याचा आनंद दुरावत चाललाय असं भासू लागतं. 

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ..." तुकाराम महाराज म्हणतात तो आनंदाचा ठेवा. मन ओढावतं. 🙏🌹

एकविसाव्या शतकात असलो तरी अजून ही शेणानी सारवलेले अंगण , त्यावर काढलेली सुबकशी रांगोळी ,  तुळशी वृंदावन , सांजवेळी लावलेला दिवा , अबोली , तगर , दूध मोगरा , मोगरा , कुंदा , शेवंती , जाईजुई चे वेल , तो मातीचा सुगंध मनात भक्कम रुजलाय. 

शेणानी सारवलेल्या अंगणात गवत काड्यांची चटई पसरवून एकत्र बसून केलेला फराळ असो की पत्त्यांचा डाव, मातीचा उबदार स्पर्श अजून हवाहवासा वाटतो. कुठेतरी आपण जमीनीशी जोडून असलेली नाळ निसटल्यासारखे वाटते. आकाशात उंच उडालेल्या पण  दोर तुटलेल्या पतंगासारखी अवस्था वाटते. 

आजच्या काळातील मनोरंजनाची इतकी साधनं नव्हती. मैदानी खेळ , झाडांवर चढणे , शक्य तेवढे पायीच फिरणे माहिती. चातुर्मासात कीर्तन , प्रवचन , कथाकथन , व्याख्यानमाला हीच मनोरंजनाची अन् प्रबोधनाची साधनं . आजच्या टीव्हीवरच्या मालिका आणि धंदेवाईक वेबसिरीज त्याकाळी नव्हत्या याचा आज आनंद वाटतो. भरपूर खेळणे , व्यायाम , उत्तमोत्तम पुस्तके वाचणे , घरचेच खाणे यावर पोसलेल्या व्यक्ति भाग्यवान. शरीराची अन् मनाची ही मशागत चांगली झाली. 

आज मागे वळून पहाताना आपण मोठा काळ सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द भारतात जगलो असं जाणवतं.  शारिरीक कष्ट झाले तरी मनाची शांतता समाधान देते.  

Wednesday, May 25, 2022

निखळ मैत्री

 अंतर्मनात आपुलकी , आस्था असावी. ज्यांच्याकडे मनमोकळेपणाने रडता येईल , आपल्या साध्या गोष्टी हसण्यावारी उडवून लावल्या जाणार नाहीत , आपली दु:ख , व्यक्त केलेला मनस्ताप उघड्यावर मांडला जाणार नाही इतका विश्वास हवा . निष्कारण गैरसमज करुन घेतले जाणार नाहीत. ज्याची त्याची स्पेस दिल्या जाईल . मदत मागताना संकोच वाटणार नाही . कुठल्याही गोष्टीचा बाऊ केला जाणार नाही अशी निखळ मैत्री हवी . आनंद देता आला पाहिजे तसा तो घेता ही आला पाहिजे. 

              असे मित्र , मैत्रिणी ज्यांच्या आयुष्यात आहेत ते भाग्यवान . I am one of such person . I am lucky to have honest and broad minded friends . 

                मी त्यांच्या कडे सहज राहू शकतो , चटई वर , अंगणात , गच्चीवर कुठे ही पाय पसरुन झोपू शकतो. मैं बाहरगांव जा रहा हूॅं थोडा पैसा देकर रख असे ही सहज म्हणू शकतो. आज मी जेवायलाच येणार आहे कदाचित उशीर झाला तर थांबेन तुझ्याकडेच असं ही मोकळेपणी सांगू शकतो. किंवा मला भूक लागली आहे काहीतरी खायला दे असं मागताना मला संकोच वाटत नाही . किती ही महिन्यात , वर्षात प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी मैत्रीत खंड पडत नाही.  मनाची जवळीक तशीच असते. घराजवळ , दूर अशा अंतराचा फरक मनात रहात नाही. 

              आर्थिक , सामाजिक स्थानामुळे फरक पडत नाही . भेटीची ओढ तीच असते. मित्र असो वा मैत्रिण मनात ' मैत्र ' हा एकच समत्व भाव असतो. 

           I am happy and satisfied . मैं शुक्रगुजार हूॅं उपरवाले का जिसने ऐसे दोस्तों की महफिल में मुझे जगह दी है l 🌹🌹

अनिरुद्ध कवीश्वर-

Sunday, May 15, 2022

ईशावास्यमिदं सर्वं

 ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।।


मला तरी वाटतं हा मंत्र समष्टि मधे वावरताना मनुष्यातील परस्पर संबंधांचा  समतोल कसा राखावा याचे सूत्र सांगतो. सृष्टी निर्माण होण्यामागची कारणमीमांसा काय या प्रश्नाची उकल यातून होत नाही. उत्पत्ती नंतरचे व्यवस्थापन कशा पध्दतीनं करता येईल जेणेकरुन स्थैर्य राहील याचा विचार मांडतो. 


" तेन त्यक्तेन भुञ्जीथा " हा समाजभान आणणारा मूलमंत्र आहे असे मला वाटते.  


" त्यक्तेन भुञ्जिथा "  हे केवळ भौतिक साधनसंपत्तीच्या संदर्भात नाही तर शारिरीक सुख आणि मानसिक आकांक्षांच्या बाबतीत देखिल उपभोगाचे उचित तत्व समजाऊन सांगतो. 


पुन्हा पुन्हा पतन का ? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. खूप आयाम आहेत. मन हे मोठं विचित्र इंद्रिय आहे. व्यक्तिला सत्य ( real ) आणि भ्रम ( virtual )  याच्या सीमारेषेवर कायम झुलवत ठेवतं. असं असून देखिल दृष्टीस पडणार्या दृष्यावरुन कोणती व्यक्ति जाणिवांच्या कोणत्या स्तरावर आहे हे कळत नाही. आपलीच परीक्षा सुरु असल्यासारखे वाटत रहाते. 


' निर्मिती ' ची योजनाच तशी असेल का ? विचारशक्तिला दमवून थकल्यावरची प्रतिक्रिया की अंती निघालेला निष्कर्ष ? वस्तू स्थिती चं यथास्थित ज्ञान होईपर्यंत केवळ अस्वस्थता !! शहाणीवाच्या चिंधड्या उडवणारी. तुम्ही मनाच्या बारिक-सारिक अवस्थांचे शब्दचित्र उभे करता. 


मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।


' मा निषाद ... ' सृष्टीशी एकतानता साधल्यावर आपसूक उमटलेला आक्रोश सूज्ञ व्यक्तिला अस्वस्थ करतो , अंतर्मनात करुणेची तार छेडतो . पण कार्यकारणभाव समजून घ्यायला उपनिषदातील तत्वज्ञानाची कास धरावी लागते. कालातीत सत्य वेगळ्या स्तरावर उमगते. जाणिवा तितक्या विस्तारतात अन् मन सुमन होण्याची प्रक्रिया सुरू होते. 


 " ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल , सर्व क्षमता त्यासाठी खर्च होत असेल त्यांना नीतिमान असण्याची , तात्विक चर्चा करण्याची चैन परवडत नाही. " हे अगदी वास्तवाशी जोडणारं आहे. प्रत्येक जीव जाणिवांच्या आणि समजूतींच्या वेगवेगळ्या स्तरांवर आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या समस्यांची उकल वेगवेगळ्या पद्धतींनी करावी लागते. निसर्गाची चौकट मानव निर्मित कायद्याच्या किंवा नीतिमत्तेच्या संकल्पनांनी बांधता येत नाही. निसर्गनियम स्वतंत्र , मुक्त अन् वेळी कठोर आहेत. 



तुम्ही तुमचं मुक्त चिंतन मोकळैपणानी समोर ठेवता. सागर भरला आहे , ज्याला जे हवं त्यांनी ते उचलावं. आपलं भावजीवन समृध्द करावं. 


अनिरुद्ध कवीश्वर-

Friday, April 15, 2022

तडित तडाडे

 आपल्याकडे काही ग्रंथकार बुध्दी म्हणजे मनाचाच विस्तार मानतात. मन हे एक विलक्षण रसायन आहे. शरीराचा ताबा घेऊन कोणत्या क्षणी ते कोणाला काय करायला भाग पाडेल याबद्दल काहीच ठोकताळे बांधता येत नाहीत.

आपल्याकडे एक मार्मिक म्हण आहे " वड्याचं तेल वांग्यावर काढणे " तात्कालिक कारणाने मनांत साचत गेलेल्या असंतोषाचा मानसिक संतूलनावर परिणाम घडत असतो. 

आत्यंतिक क्रोधाच्या क्षणी मनुष्य एक तर दुसर्याच्या जीवावर उठतो किंवा स्वतः च्याच जीवावर उठतो. भगवान कृष्ण गीतेमध्ये ही अवस्था समजाऊन सांगताना म्हणतात " क्रोधात भवती संमोह , संमोहात बुध्दीनाश: "

त्याचवेळी पश्चात बुद्धी कार्यरत होते. मनुष्य अंतर्मुख होऊन विचार करु लागतो. भानावर येतो . इथे परिवर्तन सुरु होते. अत्यंत तीव्र भावनात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याच्या वेळेस त्यांच्यासमोर ज्या गोष्टी येतात त्यांचा साधक बाधक विचार करण्याची बुध्दी त्याच्यातली ऊर्जा, अक्षम्य कृत्याच्या परिमार्जनार्थ कार्य करु इच्छिते. त्यातून काही उच्च दर्जाचे कार्य , साहित्य जन्माला येते. आपल्याकडे वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषि मधे परिवर्तन झाल्याचे उदाहरण आहेच. 


एका कवितेच्या काही ओळींची आज आठवण झाली. 


"तडित तडाडे उपजे काया

काळ्या कभिन्न मेघोदरी 

तरी का वीज नसे का साजरी "


अनिरुद्ध कवीश्वर-

Tuesday, April 12, 2022

स्पंदशास्त्र

 काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने ...


शिवसूत्रांचा मागोवा 


आठव्या शतकातील एक विद्वान आणि शिवोपासक ' वसुगुप्त ' याला स्वप्नांत दृष्टांत झाला. पहाटे तो स्वप्नांच्या अनुषंगाने शोधार्थ निघाला तेव्हा एका खडकावर कोरलेली शिवसूत्रे त्यास पहावयास मिळाली. त्यांनी स्पर्श करताच खडक उलटा झाला. जणू त्यांनी ती वाचून आत्मसात करावीत एवढंच प्रयोजन होतं.


काश्मीर मधील महादेव पर्वत हे ते ठिकाण अन् आज ही तो खडक 'शंकरपाल' म्हणून ओळखला जातो. दल लेक पासून हा प्रदेश जवळ असल्याचे समजते.


वसुगुप्तानी आपला शिष्य भट्टकलटाला ही शिवसूत्रे उलगडून सांगीतली. भट्टकलटाने ती सूत्रबध्द करुन ' स्पंदकारिका ' या ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात आणली. देवनागरी लिपी मधील स्वर - व्यंजनांची उत्पत्ती तसेच त्यांच्या अधिष्ठात्री देवता आणि शक्ति यांचे वर्णन त्यात आढळते. सृष्टीच्या निर्मितीचे गूढ यात सांगीतले आहे. ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा. हा अक्षरविज्ञान त्याचबरोबर व्यवस्थापनाची मूळ सूत्रे यांचा अलौकिक ठेवा आहे. 


भट्टकलटानंतर ही  परंपरा मुकुल भट्ट , भट्टेन्दुराज, क्षेमराज , योगराज , स्वामी मंकक (१८६०) , स्वामी राम (१८५२-१९१४) , स्वामी लक्ष्मण जू (१९०७-१९९१) पुढे नेली. 

स्वामी लक्ष्मण जू यांनी जम्मू-काश्मीरमधे ईश्वर आश्रम स्थापन केला आहे. बरेच विदेशी अभ्यासक इथे येत असतात.  


अशी ही ज्ञानोपासकांची , साधकांची  परंपरा अव्याहतपणे सुरुच आहे. अगदी आत्ताचे उदाहरण घ्यायचे झाले तर चित्रा व उमेश नगरकट्टे या उच्चविद्याविभूषित दांपत्यानी ( both Ph.d in mathematics )  स्पंदकारिका या शिवसूत्रांवर आधारीत ग्रंथाचा अभ्यासपूर्ण इंग्रजी अनुवाद २०१६ मधे प्रसिद्ध केला आहे. स्वामी मुक्तानंदांचा त्यांना आशीर्वाद होता.


ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभव या ग्रंथामध्ये तिसऱ्या अध्यायात सोळाव्या ओवीमधे स्पष्टपणे शिवसूत्रांचा उल्लेख आहे. आठव्या शतकातील वसुगुप्त आणि बाराव्या शतकातील ज्ञानेश्वर माऊली यात सुमारे चारशे वर्षांचे अंतर आहे. 

आजच्या काळातील संदेशवहनाचे, दळणवळणाचे कोणते साधन नसताना ज्ञानाची ही परंपरा कशी अखंडीत राहिली असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाथपंथीयांद्वारा गुरु-शिष्य परंपरेतून गुह्यरित्या पिढी दर पिढी पोहोचलं गेलं असावं. 

आज पुस्तक रुपाने अनेक विद्वानांनी मूळ संस्कृत भाषेतील स्पंदशास्त्राची संहिता विविध भाषांमध्ये अनुवादित केली आहे. 


यवतमाळचे डॉ. अविनाश जोशी यांनी स्पंदकारिका या ग्रंथातील अक्षरविज्ञानावर तीस वर्षे संशोधन करुन त्यावर आधारित थेरपी सुरू केली आहे. त्यांचा मुलगा स्वप्निल ही आयुर्वेदिक वैद्य असून त्याने ही थेरपी नागपूर येथे पुढे सुरु ठेवली आहे. प्रत्येक अक्षरांच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारणाचा शरीराच्या कोणकोणत्या भागावर कसा परिणाम साधल्या जातो याचं वर्णन करणारा ' आयुर्वेदीय अमृतानुभव ' हा ग्रंथ लिहिला आहे. 


काश्मीर हा केवळ एक भूभाग नाही तर सांस्कृतिक आणि ज्ञानमार्गावरील साधकांनी निर्माण केलेल्या परंपरांचा अमूल्य ठेवा आहे. संपूर्ण भारतभर अनेक प्रांतातील वेगवेगळ्या भाषिक विद्वानांनी त्याचा लाभ घेतला आहे.

वरील माहिती ही प्रचंड सागरातील एका थेंबाएवढीच आहे हे समजलं तरी त्याचं महत्व लक्षात येईल. 


अनिरुद्ध कवीश्वर- 

Friday, April 8, 2022

अमृतानुभव ऐक्य विचार

 अमृतानुभव - ऐक्य विचार


मी 'स्व' 'स्थ' होत असताना ऊर्जेच्या तरंगांशी एकरुप होतो अन् त्याच्या आनंदलहरीं वर झुलत असता माझं स्वतंत्र अस्तित्व रहात नाही . माझ्यातला मी स्वान्त सुखाच्या अधीन स्वतःला झोकून देतो. सौंदर्याचा आस्वाद घेत घेत स्वतः च सौंदर्यलहरी होणं ही अनुभूती वर्णनापलिकडे आहे. 

ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अत्यंत समर्पक उदाहरणांद्वारे तो अमृतानुभव समजाऊन देतात. 

अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे l

आणि साजिरे पणाचा लाभु मिळे l

तरी स्वतरंगांची मुकुळे l

तुरंबु का पाणी ll ५९ ll अमृतानुभव

पाण्यावर तरंग उठत असतात. स्वतः भोवती रिंगण घालतात . ते थुई थुई नाचत , गिरकी घेत असताना पाहाणं एक सुंदर अनुभव असतो. 

तरंग संपले की दृष्य नाहिसे होऊन तरंग पाण्यात सामावून जातात.  मूळ पाणी जसेच्या तसेच रहाते.   

दृष्यमान जरी भिन्न भासले तरी मूळ एकच असल्याची सौंदर्यजाणीव होत असता मुद्दलाला धक्का न लागता सहज आस्वाद घ्यायला काय हरकत आहे.  मुळास हानी न पोहोचवता सौंदर्याकडे पहाण्याची अशी नजर खरे ऐक्य साधते. 

सौंदर्य कुठे आणि कशाप्रकारे प्रकट होऊ शकते अन् त्याचा अनुभव कसा घ्यावा याची उत्तम शिकवण माऊली सोप्या सोप्या उदाहरणातून स्पष्ट करते. 

हे कैवल्याचे चांदणे अविरतपणे माऊलीच्या शब्दा शब्दांतून झिरपत असते. 


अनिरुद्ध कवीश्वर-


इक ॐकार सत् नाम वाहे गुरु "

 " इक ॐकार सत् नाम वाहे गुरु ..."


साधक असो वा नसो शंका , चिकित्सा , संशय , तर्क , बुध्दीगम्य वैचारिक वादळं , अविश्वास , भ्रम ,  मानसिक उद्विग्नता प्रत्येक आत्ममग्न या अवस्थेतून कालक्रमणा करत असतो. प्रत्येक गोष्ट पारखून स्वीकारायची त्याचे हे स्वाभाविक परिणाम आहेत. गैर काहीच नाही. इथे घाईघाईत कोणतीच गोष्ट होत नाही .


चिकित्सा करुन करुन मन थकते , श्रान्त क्लान्त होते अन् वक्षस्थळी लवंडते तेव्हा हृदयस्थ कोमल होतो. त्याच्या हळुवार , प्रेमळ स्पर्शानी मनाच्या तारा झंकारु लागतात ... तो क्षण , तोच क्षण डोळ्यातून झरणार्या अश्रुधारा अंतस्थाला शुद्ध करत अव्याहत वाहू लागतात . 


ज्ञान संशयनिवृत्त होऊन भक्तिच्या वाटेवर अग्रेसर होऊ लागते. मन सर्व अपेक्षा सांडून केवळ अनामिक आनंदाने भरुन रहाते. 


" इक ॐकार सत् नाम वाहे गुरु ..."


मन जुळवून घ्यायची आवश्यकता नसते ,  ते फक्त विस्मृतीमुळे भिन्न असल्याचे भासते. 🙏🙏


अनिरुद्ध कवीश्वर-

Monday, March 28, 2022

Road Not Taken ...

 शैलजा शेवडे यांच्या वॉल वरुन -

The Road Not Taken.

 द्विधा मनःस्थिती असली, आपल्यापुढे दोन पर्याय असतील, दोन्ही सारखेच तोलामोलाचे असतील, पण आपल्याला एकच मार्ग निवडायचा आहे, तेव्हा कसं वाटतं ना? मन अगदी गोंधळून जातं...! त्यातल्या त्यात बरा मार्ग कोणता, हे ठरवत बसतो...आणि मग तो मार्ग निवडला, त्यामुळे हे असं झालं, अशी मखलाशी करत बसतो.. स्वतःच्या मनाला समजावत बसतो. लोकांना सांगत बसतो. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता, The Road Not Taken' या कवितेत हे छान बघायला मिळते. ही कविता खरोखरच अवघड आहे..कविला काय सांगायचं आहे, हे पटकन कळतच नाही.... मी माझ्या परिने काढलेला अर्थ...

या कवितेचा काव्यानुवाद..

न घेतलेला रस्ता...दोन रस्ते फाकलेले, 

 सोनपिवळ्या जंगली या,एक मी अन दोन रस्ते, 

 कोणता तो, आपलावा?संभ्रमाने थांबलो मी, 

 वेध पुन्हा घेतला तो,जंगली या दोन रस्ते, 

 कोणता वळतो, कुठे तो । दोन ही ते सारखे पण, 

घेतला दुसराच रस्ता,छान तो गवताळ रस्ता, 

 बोलवी मज तोच रस्ता । रुळविलेले ते जरीही, 

 पावलांनी सारखेची,आवडे दुसराच रस्ता, 

 का मनाला तोच खेची । त्या सकाळी दोनही ते, 

 सारखेची शांत रस्ते,ना कुणी तुडवून पाने, 

काळवंडुन टाकले ते ।राखला मी मार्ग पहिला, 

यायला केव्हा तरी ते,ठावके देवास, वळणे, 

परतणे होई कधी ते । खूप वर्षांनी कधी मग, 

आणि जागी कोठल्याशा,मी जगा सांगेन तेव्हा, 

दीर्घ सोडूनी उसासा,’आत जाता जंगलाच्या, 

मार्ग फुटले दोन ते अन,जो न रुळला, घेतला मी, 

त्यामुळे हे वेगळेपण । .

काव्यानुवाद, सौ. शैलजा शेवडे.मूळ कविता,

The Road Not Taken

(Robert Frost, 1874 - 1963 ).

Two roads diverged in a yellow wood,

And sorry I could not travel both

And be one traveler, long I stood

And looked down one as far as I could

To where it bent in the undergrowth;.

Then took the other, as just as fair,

And having perhaps the better claim,

Because it was grassy and wanted wear;

Though as for that the passing there

Had worn them really about the same,.

And both that morning equally lay

In leaves no step had trodden black.

Oh, I kept the first for another day!

Yet knowing how way leads on to way,

I doubted if I should ever come back..

I shall be telling this with a sigh

Somewhere ages and ages hence:

Two roads diverged in a wood,

and I--I took the one less traveled by,

And that has made all the difference.

माझी प्रतिक्रिया-

खूप छान कविता अन् तितकंच सुंदर भाषांतर 🙏प्रत्येकाला विचारमग्न होण्यासाठी प्रवृत्त करणारी .

कोणी काही विचारत नसताना आपलाच आपल्याशी साधलेला संवाद . आपण निवडलेला मार्ग चुकला की काय ?

However we don't know where it is destined. Journey is endless .अनादि , अनंत , अविरत सुरू असलेला प्रवास .

बरोबर आहे का की चुकीचा यापेक्षाही ना परतीचा प्रवास हे अटळ सत्य !!फक्त मागे वळून पहाता येतं अन् वर्तमानाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्न मन करत रहातं.

कल्पना विस्तार केवळ जीवनात ला मानसिक कालावधी व्यापत रहातो. प्रवास अनियंत्रित , अनिश्चित आणि गूढ .

अनिरुद्ध कवीश्वर-