Monday, March 28, 2022

Road Not Taken ...

 शैलजा शेवडे यांच्या वॉल वरुन -

The Road Not Taken.

 द्विधा मनःस्थिती असली, आपल्यापुढे दोन पर्याय असतील, दोन्ही सारखेच तोलामोलाचे असतील, पण आपल्याला एकच मार्ग निवडायचा आहे, तेव्हा कसं वाटतं ना? मन अगदी गोंधळून जातं...! त्यातल्या त्यात बरा मार्ग कोणता, हे ठरवत बसतो...आणि मग तो मार्ग निवडला, त्यामुळे हे असं झालं, अशी मखलाशी करत बसतो.. स्वतःच्या मनाला समजावत बसतो. लोकांना सांगत बसतो. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता, The Road Not Taken' या कवितेत हे छान बघायला मिळते. ही कविता खरोखरच अवघड आहे..कविला काय सांगायचं आहे, हे पटकन कळतच नाही.... मी माझ्या परिने काढलेला अर्थ...

या कवितेचा काव्यानुवाद..

न घेतलेला रस्ता...दोन रस्ते फाकलेले, 

 सोनपिवळ्या जंगली या,एक मी अन दोन रस्ते, 

 कोणता तो, आपलावा?संभ्रमाने थांबलो मी, 

 वेध पुन्हा घेतला तो,जंगली या दोन रस्ते, 

 कोणता वळतो, कुठे तो । दोन ही ते सारखे पण, 

घेतला दुसराच रस्ता,छान तो गवताळ रस्ता, 

 बोलवी मज तोच रस्ता । रुळविलेले ते जरीही, 

 पावलांनी सारखेची,आवडे दुसराच रस्ता, 

 का मनाला तोच खेची । त्या सकाळी दोनही ते, 

 सारखेची शांत रस्ते,ना कुणी तुडवून पाने, 

काळवंडुन टाकले ते ।राखला मी मार्ग पहिला, 

यायला केव्हा तरी ते,ठावके देवास, वळणे, 

परतणे होई कधी ते । खूप वर्षांनी कधी मग, 

आणि जागी कोठल्याशा,मी जगा सांगेन तेव्हा, 

दीर्घ सोडूनी उसासा,’आत जाता जंगलाच्या, 

मार्ग फुटले दोन ते अन,जो न रुळला, घेतला मी, 

त्यामुळे हे वेगळेपण । .

काव्यानुवाद, सौ. शैलजा शेवडे.मूळ कविता,

The Road Not Taken

(Robert Frost, 1874 - 1963 ).

Two roads diverged in a yellow wood,

And sorry I could not travel both

And be one traveler, long I stood

And looked down one as far as I could

To where it bent in the undergrowth;.

Then took the other, as just as fair,

And having perhaps the better claim,

Because it was grassy and wanted wear;

Though as for that the passing there

Had worn them really about the same,.

And both that morning equally lay

In leaves no step had trodden black.

Oh, I kept the first for another day!

Yet knowing how way leads on to way,

I doubted if I should ever come back..

I shall be telling this with a sigh

Somewhere ages and ages hence:

Two roads diverged in a wood,

and I--I took the one less traveled by,

And that has made all the difference.

माझी प्रतिक्रिया-

खूप छान कविता अन् तितकंच सुंदर भाषांतर 🙏प्रत्येकाला विचारमग्न होण्यासाठी प्रवृत्त करणारी .

कोणी काही विचारत नसताना आपलाच आपल्याशी साधलेला संवाद . आपण निवडलेला मार्ग चुकला की काय ?

However we don't know where it is destined. Journey is endless .अनादि , अनंत , अविरत सुरू असलेला प्रवास .

बरोबर आहे का की चुकीचा यापेक्षाही ना परतीचा प्रवास हे अटळ सत्य !!फक्त मागे वळून पहाता येतं अन् वर्तमानाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्न मन करत रहातं.

कल्पना विस्तार केवळ जीवनात ला मानसिक कालावधी व्यापत रहातो. प्रवास अनियंत्रित , अनिश्चित आणि गूढ .

अनिरुद्ध कवीश्वर-