" इक ॐकार सत् नाम वाहे गुरु ..."
साधक असो वा नसो शंका , चिकित्सा , संशय , तर्क , बुध्दीगम्य वैचारिक वादळं , अविश्वास , भ्रम , मानसिक उद्विग्नता प्रत्येक आत्ममग्न या अवस्थेतून कालक्रमणा करत असतो. प्रत्येक गोष्ट पारखून स्वीकारायची त्याचे हे स्वाभाविक परिणाम आहेत. गैर काहीच नाही. इथे घाईघाईत कोणतीच गोष्ट होत नाही .
चिकित्सा करुन करुन मन थकते , श्रान्त क्लान्त होते अन् वक्षस्थळी लवंडते तेव्हा हृदयस्थ कोमल होतो. त्याच्या हळुवार , प्रेमळ स्पर्शानी मनाच्या तारा झंकारु लागतात ... तो क्षण , तोच क्षण डोळ्यातून झरणार्या अश्रुधारा अंतस्थाला शुद्ध करत अव्याहत वाहू लागतात .
ज्ञान संशयनिवृत्त होऊन भक्तिच्या वाटेवर अग्रेसर होऊ लागते. मन सर्व अपेक्षा सांडून केवळ अनामिक आनंदाने भरुन रहाते.
" इक ॐकार सत् नाम वाहे गुरु ..."
मन जुळवून घ्यायची आवश्यकता नसते , ते फक्त विस्मृतीमुळे भिन्न असल्याचे भासते. 🙏🙏
अनिरुद्ध कवीश्वर-
No comments:
Post a Comment