शोध अंतर्मनाचा ...
आपण जितकं बोलून किंवा लिहून शब्दांतून व्यक्त होतो त्यापेक्षा कैक पटीनी मोठ्या मौनात , शांतीमधे त्याचं अस्तित्व अवस्थित असतं. अनंत झगमगणार्या प्रकाशमय दूधगंगांना ही सामावून घेणारी तथाकथित पोकळी अंधारीच असते.
काळोखाला ही वाणी असते का ? की केवळ हुंकार "तथास्तू" म्हणणारा ? कालातीत , सदैव वर्तमानात , संवादी ? कुठल्याही माध्यमांची गरज नसलेला , स्वयंभू?
निव्वळ स्पंदन , प्रसारीत होत जाणारी एक अविरत उर्जा , अनादि-अनंत , शिव संकल्प ...
घटना म्हणजे स्पंदनांचा दृष्य परिणाम !! कुठलीही उपाधि नसलेला . वेध शाश्वताचा , सातत्याचा , सत्याचा की स्वयंस्फूर्तीने दूर होणार्या पटलांचा ? आजचे सार्वकालिक ज्ञानोपरांत तात्कालिक या वर्तुळाकार मार्गाचा ?
मागोवा माझाच , मीच घेतलेला, की शोध अज्ञाताचा ? अनुत्तरीत मालिका अवरुद्ध करणारी की मुक्तीचे दरवाजे किलकिले करणारी एक यक्षप्रश्न !!
मानस एकच , चित्त एकच फक्त वृत्तीची आवर्तने वेगवेगळी . " जगन्मिथ्या " , " एकोहं ", " तत्वमसि " "अहं ब्रह्मास्मि " ज्ञानेश्वर माऊली च्या भाषेत "आत्मरुपा"
मौनाची भाषा अनुभव समृध्द करणारी 🙏🙏
अनिरुद्ध कवीश्वर-
No comments:
Post a Comment