Thursday, November 9, 2023

संवाद

 सुप्रभात 🙏

दोन व्यक्ती जेव्हा संवाद साधतात तेव्हा अप्रत्यक्षरित्या आत्मिक तरंगांशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतात. चार वाणी वैखरी , मध्यमा , पश्यंती आणि परा . 

यापैकी वैखरी वाणी तील ध्वनिकंपनांशी आपण परिचित आहोत. अक्षरं आणि शब्दांच्या उच्चारातून वैखरी वाणी प्रत्यक्ष रित्या आपण ऐकतो. 

मध्यमा वाणी म्हणजे अक्षरं आणि शब्द केवळ दृष्य स्वरुपात आपल्यासमोर आले तरी विचार प्रवर्तन होते. याचा ही  आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून परिचय असतो. 

पश्यंती वाणी मधून स्वतः चे स्वतः शी वैचारिक मंथन कायम सुरु असते . त्यातून देखिल विद्युत-चुंबकीय तरंग प्रसारित होत असतात. 

परावाणी ही विश्वचैतन्यात स्फुरणार्या  तरंग आणि तदानुषांगिक कंपनांशी चित्त जोडून घेते . 

विश्वचैतन्याची व्याप्ती अपरिमित आहे. त्यामुळे दोन व्यक्ती ज्यांचे विचारतरंग जुळतात त्या शारिरीक दृष्ट्या  एकमेकांपासून 

कितीही दूर असल्या तरी वास्तविक पहाता अगदी ह्रदयाला स्पर्श करीत असतात. 

आपले खरे आप्त तेच असतात हो की नाही?

अनिरुध्द कवीश्वर -

No comments: