ज्ञानेश्वरी मधील विज्ञान...
आम्ही आधी आमचे ग्रंथ अभ्यासले पाहिजेत . त्यावेळची शब्दावली ( Terminology )वेगळी असली तरी आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांशी नाते जोडणारी आहे.
ज्ञानेश्वरी मधे अध्यात्म आणि वाड्:मय सौंदर्या बरोबर विज्ञान ही प्रतिपादिले आहे.
अथवा नावें हन जो रिगे ।
तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।
तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥९७॥
अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनार्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते. पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. ॥९७॥
थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी - आईन्स्टाईन
आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें ।
जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणें ।
कर्मींचि असतां ॥९९॥
आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ॥९९॥
गॅलेलियो, कोपर्निकस यांच्या काही शतके अगोदर ज्ञानदेवांनी प्रतिपादिले आहे.
परी महाभूतें पोटीं वाहे ।
तेवींचि परमाणूमाजीं सामाये ।
या विश्वानुसार होये ।
गगन जैसें ॥ १६-१७३ ॥
जसे आकाश आपल्या पोटात (वायू वगैरे) महाभूतांस धारण करते परंतु त्याचप्रमाणे ते (आकाश) परमाणूमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते. ॥१६-१७३॥
क्वांटम् फिजीसिस्ट ( पूॅंज सिध्दांती ) यांच्या ही आधी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आहे.
डॉ काप्रा म्हणतो , " In eastern Mysticism, Universal inter-woveness includes the observed and observer's consciousness; that is also the experience of atomic science. The Mystics and the scientist often arrive at similar conclusion, one from within and the other from outside ... "
ज्ञानेश्वर महाराज यासंदर्भात त्यापुढे जाऊन सांगतात ब्रह्माच्या उपासनेत त्रिपुटीच्या संकल्पनेचा त्याग करावा लागतो.
लक्ष लावुनि त्रिपुटी ठाण त्रिभंगी चोखडें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग
निर्गुण ब्रह्माच्या उपासनेत ध्यान, ध्याता, व ध्येय या त्रिपुटीचा त्याग करावा लागतो.
अनिरुध्द कवीश्वर-
संदर्भ: श्री ज्ञानेश्वरी-विज्ञान दर्शन
लेखक मुकुंद सदाशिव गोखले
No comments:
Post a Comment