Friday, November 24, 2023

ज्याचा त्याचा कृष्ण..

 सुप्रभात 🙏,


ज्याचा त्याचा कृष्ण..


खरंच अपेक्षारहित आपुलकी , आस्था मनाला शांत करते. 

मला विट्ठल फार आवडतो. ना हात आशीर्वाद देण्यासाठी ना काही घेण्यासाठी , देणं ना घेणं फक्तं कमरेवर हात ठेऊन प्रेमानी , वात्सल्यापोटी तो आपली वाट पहात असतो. 

टाळ - मृदंगाचा सुरेल नाद त्याला प्रसन्न करतो आणि त्याची प्रसन्नता आपल्याला आनंद देते. 

सर्व त्रिविध ताप विसरायला लावतो , भुलवतो , धुंद करतो असा तो मन-मोहन आहे. स्त्री पुरुष भेदरहित सर्वांचा तो सखा आहे. 

संत जनाबाई एका अभंगात म्हणते ..

"जनी सांगे सर्व लोकां । 

न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥"

हे त्याचे न्हाऊ घालणे म्हणजे भक्तिरसात भिजवून जीवाची तगमग शांत करण्यासाठी केलेला प्रेमाचा वर्षाव . धन्य ते सर्व संत ज्यांना त्यांचा सखा सापडला. 

तसा ज्याला त्याला त्याचा कृष्ण सापडावा अन् ओळखता ही यावा. 🙏🌹

जय जय रामकृष्ण हरि 

जय जय रामकृष्ण हरि 


अनिरुध्द कवीश्वर -

No comments: