पतंजली योगशास्त्र...
पतंजली योगशास्त्र म्हणजे निरोगी जीवन जगण्याची कला आहे. शरीर आणि मन यांचा समन्वय कसा साधावा यांची सूत्रे सांगीतली आहेत. त्याला एक सिक्वेन्स आहे.
यम - नियम साध्य केल्यावर आसन स्थिर होते. स्थिर सुखासनात प्राणायाम उत्तम साधतो . त्यात सातत्य असले की धारणा , म्हणजे मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी असलेल्या संकल्पना पक्क्या होतात. आसन स्थिर झाले आणि धारणा रुजल्या की ध्यानावस्था लवकर साधते . ध्यानाची अनिर्वचनीय सूप्त शक्ती म्हणजे समाधि अवस्था.
अध्यात्मामधे शॉर्टकट नाहीत. मन निर्मळ होणे , स्वतः शी प्रामाणिक असणे महत्वाचे .
सद्गुरूंना , कुलदेवतेला , आराध्य देवतेला नम्रपणे विनंती करुन सहाय्य मागणे यात कुठलाही कमीपणा नाही. आपल्या मनातील तगमग , शंका-कुशंकांचे आपोआप निरसन होत रहाते.
जन्म हा एकप्रकारचा मृत्यु अन् मृत्यु हा एक प्रकारे नवा जन्म होय. घडते ते फक्त " स्थित्यंतर " .
It's continuous process of evolvement from one state to another as well as one phase to another. It is happening every moment without any break.
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment