सुप्रभात 🙏 🌹
सुदर्शनचक्र म्हणा , ऋतुचक्र म्हणा , रथचक्र म्हणा चक्र हे प्रगतिचे आणि गतिचे द्योतक मानले गेले आहे.
चंद्र स्वतः भोवती पृथ्वीभोवती , सूर्याभोवती , पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती, सूर्य स्वतः भोवती अन् ग्रहमंडळासह दूधगंगेच्या आसाभोवती चक्राकार फिरत आहे.
हे सर्व तारामंडल , ग्रहमंडल , उपग्रहमंडल आणि धूमकेतूंसह दूधगंगा स्वतः भोवती चक्राकार फिरत आहे.
दूधगंगेसह सर्व भोवर्यासारखे आवर्त घेऊन ऊर्ध्वगामी गतिमय तसेच स्पंदनशील आहे .
या सर्वाची मूल प्रेरणा शिवाची स्पंदशक्ती आहे. स्पंदने हा या स्पंदशक्तीचा परिणाम आहे.
या स्पंदनामुळे जो नाद निर्माण होतो तो आद्य नाद म्हणजे ॐकार . शिवाच्या डमरु वादनातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या लयींमुळे ध्वनी अन् आकार ऋषिंच्या मनात उमटले ती अक्षरे. त्यातून शब्द , भाव , दृष्य दृगोच्चर झाले. म्हणून आपल्या सृष्टीला शब्दसृष्टी संबोधल्या गेले आहे. विचार शब्दांशिवाय प्रकट होत नाहीत.
अनिरुद्ध कवीश्वर
No comments:
Post a Comment