मन तरंग ...
कधी कधी अपेक्षाभंग , त्यानुषंगाने होणारी चिडचिड , मनाला आलेली मरगळ , कोरडी भावनांची गुंतावळ , अस्वस्थता , बेचैनी , दुनियादारी चा पोखरत रहाणारा भुंगा आणि अकारण आलेला थकवा ...
कोषात जाणे चांगले असे वाटू लागते.
आपण सुखद अनुभूतींपेक्षा डागण्या देणार्या विचारांना कुरवाळत रहातो. अजून अजून अगतिकता जवळ करतो. निराशा आळवत रहातो. नकळत आपण एकलकोंडेपणा च्या आहारी जात आहोत हे समजत नाही.
आत्मिक समाधान आणि आनंद देणारा , मन प्रसन्न करणारा वेळ तेवढाच आपला स्वतः साठी जगल्याचा काळ . हा कॅनव्हास मोठा करणं आपल्याच हाती आहे.
जीवन सुंदर आहे. जाणिवा विकसित करुन उपभोग घेता येतो. सौंदर्यानुभूती मनाची एक उच्च , तरल , शुभदायिनी अवस्था आहे.
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment