रांगोळी एक ऊर्जा देणारी कला...
पहाटे पहाटे सडा टाकून दक्षिणेत अजून ही घरासमोर छान वैशिष्ट्य पूर्ण पारंपारिक रांगोळ्या काढल्या जातात.
रांगोळी चा उगम मंडला पासून झाला. आकाशस्थ ग्रह तारे यांचेशी पूजा पध्दतीच्या आधारे संपर्क साधण्याचे शास्त्र म्हणून मंडलांची निर्मिती झाली.
पारंपारिक रांगोळ्या या त्या मंडलांचेच स्थूल स्वरुप आहे. सृष्टीच्या निर्मितीशी , वैश्विक उर्जेशी संबंध जोडणार्या पारंपारिक रांगोळ्या शुभचिन्हे समजल्या जातात.
सर्जनशीलतेला आवाहन करणार्या रांगोळ्या घर-अंगणाचा परिसर आणि मनाला प्रसन्न करणार्या असतात.
मातीचे अंगण शेणानी सारवून त्यावर तांदळाची पिठी ओली करुन विविध आकाराची पारंपारिक रांगोळी काढली की त्यातील सौंदर्य मनाला आनंद देते.
दिवसाची सुरुवातच मंगलाचरणानी आणि सुंदर रांगोळ्यांनी केली की दिवसभराची ऊर्जा प्राप्त होते.
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment