जीवन जगण्याची कला
कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे यासाठी चिंतन संतांनी केले आणि सोपे करुन सांगीतले .
प्रत्येक क्षण नूतन , त्याचा अनुभव नूतन . क्षणोक्षणी बदलणार्या भावभावनांच्या खेळात माणूस स्वतः लाच हरवून बसतो. मन दु:खी असलं की असं वाटतं हे चक्र कधी थांबेल अन् मन प्रसन्न असलं की वाटतं काळ इथेच थांबावा.
सततचे मानसिक आंदोलन , परिस्थिती चा रेटा , त्रास नकोसा होतो. त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे ही मन खंतावते. यावर उत्तम उपाय म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी करत रहाणे. कधी जमतं कधी नाही .
तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे
" मन करा रे प्रसन्न
सर्व सुखाचे कारण "
आयुष्यातले आनंदी क्षण वेचणे आणि चुका आपल्या असो का इतरांच्या माफ करुन वाटचाल करणे म्हणजे मनाला मुक्त करणे.
त्याचे अवीट प्रेम आणि तो कृष्ण माझा सखा आहे. हे मनांत पक्के असू द्यावे.
कोणी मनुष्य , नातेवाईक , कोणी स्वार्थ वागविणारा आपण जवळचा मानला तरी भ्रमनिरास होऊ शकतो. पण कृष्ण मात्र प्रेमळ आणि प्रत्येकाचे विश्रांती स्थळ आहे.
ज्यांचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता यावा.
अनिरुध्द कवीश्वर -
No comments:
Post a Comment