Friday, October 20, 2023

समाजभान

 सुप्रभात 🙏

निसर्ग मानवांनी निर्माण केलेला कायदा जाणत नाही. नैसर्गिक उर्मी सहज आणि उपजत असतात. हार्मोन्स मधील बदल व्यक्तींमधे  वेगवेगळ्या वयात होतात. सर्वसाधारणपणे दहा ते १८ या कोणत्याही कालावधीत होऊ शकतात. 

मुलगा असो का मुलगी दोघांना ही अशा बदलांना , आकर्षणाच्या तीव्र उर्मींना कसे हाताळायचे याबाबतचे मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. तसेच न सांभाळता आल्याने हिंस्त्र आविष्काराला बळी पडलेल्या मुलींना लोकनिंदे पासून वाचवणे आणि सहानुभूती पूर्वक समजून घेण्याची गरज आहे. 

मुलांना लैंगिक शिक्षणाबरोबरच मुलींच्या लैंगिक इच्छेबाबत स्वनिर्णयाचा आदर करणे शिकवल्या गेले पाहिजे.

As a prudent and culturally evolved person one must have respect towards emotions of everyone.

This can reduce the percentage of unnatural events but can't eradicate . विचारांनी आणि वृत्तीने उन्नत होण्याची प्रक्रिया प्रत्येक व्यक्ती मधे वेगवेगळ्या वयात होते. परंतु समाजात सर्व एकत्र रहात असल्याने संघर्ष हा होणारच. 

याकरिता कर्मांचा सिध्दांत उपयोगी होऊ शकतो. गुंड प्रवृत्ती आणि हिंस्त्र व्यवहार यांचे दृष्य परिणाम कधी दिसतात कधी प्रत्यक्ष दिसत नसले तरी होतातच हे नक्की. कारण त्रास देणाऱ्या व्यक्तींना होणारे मानसिक पातळीवरील त्रास दिसत नाहीत. 

मूलभूत शिक्षण हे व्यक्तीला लिंगभेदारहित शारिरीक रित्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास जागृत करणारे असावे. 

अनिरुध्द कवीश्वर -

No comments: