Sunday, October 15, 2023

मानस आयुर्वेद

 सुप्रभात 🙏 🌹


अल्बर्ट एलिस हा REBT ( Rational Emotive Behavioural Therapy )चा प्रणेता मानला जातो. " मी अल्बर्ट एलिस" हे त्याचे आत्मचरित्र वाचलं आहे. 

वयाच्या वेगवेगळ्या कालखंडात प्रत्येक व्यक्ती का तसं वागते त्यावर त्यानी कारणमीमांसा दिली आहे. 

जगभरात क्लिनिकल सायकॉलॉजी साठी त्याची थेरपी उपयोगात आणली जाते. 

त्याच्या आयुष्याचा शेवट मात्र फार मार्मिक आहे . तो वाचण्यासारखा , विचार करण्यासारखा आहे. 

आपल्याकडे विदर्भात गुलाबराव महाराज नावाचे एक अंध संत होऊन गेले. त्यांनी विविध विषयांवर १३५ ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथरचना वर नागपूरचे श्री घटाटे यांनी पीएच् डी घेतली. 

या गुलाबराव महाराजांचे भारतीय मानसशास्त्रा वर आधारित एक पुस्तक आहे. " मानस आयुर्वेद " यात मांडलेली विचारसंपदा अधिक समृध्द आहे.

आपल्या संतांनी सामान्य लोकांसाठी ज्या गोष्टी लिहून ठेवल्या त्यांचे मार्केटिंग नाही केले. सार्वजनिक हिताच्या गोष्टींचे मार्केटिंग ही संकल्पना आपल्याकडे रुजली नाही. 

🙏🏻🙏🏻

अनिरुध्द कवीश्वर -

No comments: