पृथ्वीचे दोहन आणि शोधन ज्याप्रकारे होईल त्याचप्रकारे त्यांचे परिणाम होतील. पूर्व काळात गौ आणि गौदुग्धाचे दोहन आणि कृषि उत्पादनाचे शोधन होत होते. निसर्गाशी जवळीक साधून होत असल्यामुळे एकप्रकारचा समन्वय होता. त्यामुळे शांत , समाधानी जीवन होते.
आजच्या काळामध्ये यंत्र आणि तंत्राचे दोहन , शोधन होते. त्यामुळे जीवन ही यंत्रवत् झाले आहे.
याकरीता मानवी जीवनाचे उन्नयन कुठल्या मार्गांनी करायचे याचे विवेचन भगवद्गीतेत कृष्णानी सांगीतले. गीता म्हणजे उपनिषदांचे दोहन आणि मानवी जीवनाला पूर्णत्व आणण्याचे शोधन .
यंत्र म्हणजे कर्मेंद्रियांचे एकप्रकारे एक्स्टेंशन. कोणत्याही काळात ज्ञानेंद्रिये मात्र तीच आहेत. याकरीता कृष्णाचा उपदेश कालातीत आहे.
ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा.
अनिरुध्द कवीश्वर -
No comments:
Post a Comment