बेमुर्वतपणे धबधब्यासारखे उड्या घेणे म्हणजे स्वैर जगणे . आपल्याच धुंदीत झुलणे. कधी अवखळपणे , कधी शांतपणे वाहणे , मधेच थबकणे तर कधी डोहातले हळुच डहुळणे.
मनानी मनाशी केलेला संवाद आपल्यालाच ऐकू येणारा . आत्ममग्नतेत तन्मय होणारा. स्वयंस्फूर्त !! संतुष्ट होण्यासाठी अविरत गुजबुज.
कलंदर होणे सोपे नाही. बरेच काही मागे सोडून नित्य नव्यानं , कुतूहलानं स्वीकारण्याची मानसिकता धारण करणे ही पहिली पायरी.
येईल त्याला सामोरे जात पाण्यासारखं कचरा किनारी फेकत खळाळत स्वच्छंदपणे काळाला आपल्या मागे धावायला लावणं.
जीवन जगण्याची परिभाषाच बदलून जाते. इतरही केवळ आपल्या उत्साही पणाने उद्युक्त होतात.
मन प्रसन्न करण्यासाठी सहज , स्वयंस्फूर्तीने वाटचाल करावी . त्यातला अनुपम आनंद लुटावा.
🙏🙏
अनिरुध्द कवीश्वर -
No comments:
Post a Comment