आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
बरसत आली वळवाची सर, तसे तयाने यावे
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे
सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे
ग. दि. माडगुळकर
आशा भोसले
सुधीर फडके
मुंबईचा जावई - 1970
हे नुसतं गाणं नाही तर त्या शब्दांनाही वजन आहे , अर्थ आहे , भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य आहे.
कुणीतरी यावे ते ही कसे तर वळवाच्या पावसासारखे अचानक ...
श्वासांत भरुन घ्यावा असा हलका मृदगंध घेऊन ...
विचारल्याविण हेतू कळावा असा तो स्नेह जुळावा ....
काय variation आहे 👌👌
गाण्याला पार्श्वभूमी आहे ती कालिदासाच्या मेघदूताची आठवण करुन देणा-या घनभरल्या मेघांची . रिमझिम पडणा-या पावसाची .
आशाताईंचा लडिवाळ आवाज आणि नायिकेनी चेह-यावर साकारलेली सहज आनंदाची लकेर ...
अशी काही गाणी मनांत घर करतात . ऐकता ऐकता वेगळ्या विश्वात घेऊन जातात. स्वप्नातल्या दुनियेत.
आपण या अत्यंत विद्वान कवींच्या सहजसुंदर गीतांचे साक्षीदार आहोत. मराठी मधे शिकलो , मराठी गीतांचा अर्थ समजू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. मनाच्या एक तरल अवस्थेची जाण या कवींच्या गाण्यांनी करुन दिली. आपण खरंच भाग्यवान आहोत.
अनिरुद्ध कवीश्वर-
No comments:
Post a Comment